आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; पहिल्याच सामन्यात भिडणार रोहित – विराट

mi vs rcb
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 ची रणधुमाळी आजपासून सुरू असून होणार असून पहिला सामना गटविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात होणार आहे. भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील हा महामुकाबला चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

रोहित शर्माची मुंबई इंडिअन्स आयपीएल मधील सर्वात बलाढय टीम असून आत्तापर्यंत मुंबईने तब्बल 5 वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. मुंबईकडे रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव कायरन पोलार्ड जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या सारखे मातब्बर खेळाडू असून मुंबईचा संघ तगडा आहे. कर्णधार रोहित शर्मा चे कल्पक नेतृत्व मुंबईसाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

तर दुसरीकडे विराट कोहलीच्या बंगळुरू संघाचा आयपीएल मधील आतापर्यंतचा प्रवास अंत्यत बिकट झाला असून अजून एकदाही त्यांना आयपीएल जिंकता आली नाही. विराट कोहली, एबी डीविलीर्स, युझवेन्द्र चहल असे स्पेशालिस्ट खेळाडू असून देखील आरसीबीचा खेळ म्हणावा तसा चांगला झाला नाही. परंतु यंदा ग्लेन मॅक्सवेल च्या रूपाने आक्रमक फलंदाज आणि काइल जमैसिन आणि क्रिस्टियनच्या रुपाने चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश असल्याने आरसीबीचा संघ थोडा तगडा वाटतो. पण बलाढ्य मुंबई विरुध्दचा सामना नक्कीच त्यांच्यासाठी सोप्पा नसेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group