पुणेकर ऋतुराज गायकवाडच्या नावावर ‘या’ नकोश्या विक्रमाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आताच्या आयपीएल मध्ये चेन्नई सुपरकिंग्सची टीम जबदस्त प्रदर्शन करत आहे. चेन्नई सुपरकिंग्सने ५ पैकी ४ सामने जिंकत गुणतालिकेत अव्व्ल स्थान मिळवले आहे. ह्याच चेन्नई सुपरकिंग्सला मागच्या सीझनमध्ये प्ले ऑफ पर्यंतसुद्धा पोहचता आले नव्हते. त्यानंतर चेन्नईने आपल्या खेळात सुधारणा करत जबरदस्त पुनरागमन केले आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या यशाचे महत्वाचे कारण म्हणजे जबदस्त फॉर्ममध्ये असलेले बॅट्समन. फाफ डुप्लेसिस आणि पुणेकर ऋतुराज गायकवाड यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीमुळे चेन्नईला सगळे सामने जिंकता आले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या आजच्या सामन्यात देखील फाफ डुप्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी ९.१ ओव्हरमध्ये ७४ धावांची सुरुवात करून दिली. त्यानंतर ऋतुराज ३३ धावांवर बाद झाला.आणि त्यानंतर त्याच्या नावावर एक नकोशा विक्रमाची नोंद झाली. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे कि ११ किंवा त्यापेक्षा जास्त रन केल्यानंतर त्याला अर्धशतक करता आलेले नाही.

आतापर्यंत आयपीएलमध्ये ऋतुराजने ११ सामन्यांमध्ये ३५.६६ च्या सरासरीने आणि ११७.५८ च्या स्ट्राईक रेटने ३२१ धावा केल्या आहेत.यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल करियरमध्ये ऋतुराजचा सर्वाधिक स्कोअर ७२ आहे. मागच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये ऋतुराजने सलग ३ सामन्यांत ३ अर्धशतके केली होती. आयपीएल इतिहासात एखाद्या अनकॅप प्लेयरमध्ये लागोपाठ ३ अर्धशतकं करणारा ऋतुराज पहिलाच खेळाडू ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये देखील ऋतुराज एक अर्धशतक केले आहे. ऋतुराजने मागच्या ११ सामन्यांत ०, ५, ०, ६५, ७२, ६२, ५, ५, १०, ६४, ३३ अशा धावा केल्या आहेत.

Leave a Comment