दिल्ली कॅपिटल्स संघाला फक्त ‘या’ एका खेळाडूची वाटते भीती

Delhi capitals
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो : महाराष्ट्र ऑनलाईन – आज संध्याकाळी हैदराबाद आणि दिल्ली यांच्यामध्ये आयपीएलचा सामना रंगणार आहे. त्यामध्येच आता दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी दिल्ली कॅपिटल्स चेन्नईच्या धीम्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा कसा सामना करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या अगोदरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवून आत्मविश्वास मिळवला होता. त्यामुळे हाच आत्मविश्वास सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कायम ठेवण्यासाठी दिल्लीचा संघ प्रयत्न करणार आहे. “आमचे फलंदाज हैदराबादच्या राशिद खानच्या फिरकीचा चेन्नईच्या फिरकीला पोषक खेळपट्टीवर कसा सामना करतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे असे मोहम्मद कैफ म्हणाले.

चेन्नईच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सगळ्याच खेळाडूंना अवघड जात आहे. पण तरीदेखील संघातील अनुभवी फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत असेदेखील मोहम्मद कैफ म्हणाले. “शिखर धवन खूप चांगली फलंदाजी करत आहे आणि स्टीव्ह स्मिथनंही गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. अमित मिश्रानं गेल्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी आणि आमच्याकडे आर.अश्विन देखील आहे. मार्कस स्टॉयनिसनं गेल्या सामन्यात नव्या चेंडूनं चांगला मारा केला. त्यामुळे फिरकीला पोषक खेळपट्टीवरही आमचा संघ अव्वल कामगिरी करेल”, अशी आशा मोहम्मद कैफ यांनी व्यक्त केली आहे.

अक्षर पटेलचं पुनरागमन
दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेल याला कोरोना झाल्यामुळे काही सामने तो संघाबाहेर होता. पण आता तो पूर्णपणे फिट असल्याचे समजत आहे. “दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या संतुलित संघ आहे. अक्षर पटेल देखील संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. गेल्या सीझनमध्ये दिल्लीच्या संघाला फायनलपर्यंत घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. अक्षर, मिश्रा आणि अश्विन यांनी एकत्र खेळणं आमच्यासाठी स्वप्नवत ठरेल”, असे मत दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी व्यक्त केले आहे.