हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज आयपीएलमधला दुसरा डबल हेडर सामना रंगणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये होणार आहे. सध्या हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. या हंगामात पंजाब ३ सामन्यांपैकी १ सामना जिंकून गुणतालिकेत ७ स्थानी तर सनरायझर्स हैदराबाद अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहे. हैदराबादने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत.
गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहोचला होता. यंदासुद्धा हैदराबाद अशीच कामगिरी करतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हैदराबादला सध्या संघाच्या मधल्या फळीत सुधारणा करणे गरजेचे आहे. तसेच नुकताच दुखापतीतून सावरणाऱ्या केन विल्यमसनला या सामन्यासाठी संघात जागा मिळेल का,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे मयंक अग्रवालचा फॉर्म ही पंजाबसाठी दिलासादायक बाब आहे. कर्णधार केएल राहुलने मागील काही सामन्यांत चांगली कामगिरी केली पण त्याची खेळी थोडी संथ होती. तसेच ख्रिस गेलला देखील अजूनही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. तसेच निकोलस पूरनसुद्धा चमकदार कामगिरी करू शकला नाही. तसेच युवा फलंदाज शाहरुख खानने आपल्या फलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केले आहे. त्यामुळे आजही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे
पंजाब किंग्ज: लोकेश राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रभसिमरन सिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सरफराज खान, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, ईशान पोरेल, दर्शन नलकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मालन, झाई रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरीडिथ, मोईसेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्षसिंग, फॅबियन एलन आणि सौरभ कुमार.
सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बेसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, विजय शंकर, वृध्दिमान साहा (यष्टिरक्षक), अब्दुल समद, जेसन रॉय, जेसन होल्डर, प्रियांम गर्ग, विराट सिंग, केदार जाधव, मुजीब उर रहमान आणि जे. सुचीत.