IPL 2022 Final मध्ये पाऊस आला तर ‘हा’ संघ होणार होणार चॅम्पियन, जाणून घ्या काय आहे नवीन नियम

IPL 2022 Final
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद : वृत्तसंस्था – काही वेळातच गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल 2022 चा अंतिम (IPL 2022 Final) सामना खेळवण्यात येणार आहे. गुजरातने क्वालिफायर 1 मध्ये राजस्थानला मात देऊन थेट फायनलमध्ये प्रवेश केला, तर राजस्थानने क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटरची विजेती आरसीबीला हरवून फायनलमध्ये (IPL 2022 Final) प्रवेश केला आहे. गुजरात टायटन्सची ही पहिली आयपीएल आहे, तर राजस्थानने सर्वात पहिली आयपीएल जिंकली आहे. आयपीएल 2022 ची फायनल गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. यादरम्यान पावसामुळे मॅच होऊ शकली नाही, तर गुजरात-राजस्थान यांच्यात कोणाला विजेता घोषित करण्यात येईल? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यासाठी आयपीएलच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. काय आहे नवीन नियम चला पाहूया…

1) फायनलसाठी राखीव दिवस
आयपीएल 2022 ची फायनल (IPL 2022 Final) रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. खराब वातावरणामुळे मॅच सुरू व्हायला उशीर झाला तर रात्री 10.10 वाजेपर्यंत मॅचला सुरूवात करण्यात येईल. दोन तासांच्या विलंबानंतरही ओव्हर कमी करण्यात येणार नाहीत. हवामानाने खूपच त्रास दिला तर जास्तीत जास्त रात्री 12.26 पर्यंत मॅच सुरू केली जाऊ शकते, या परिस्थितीमध्ये 5-5 ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल.

2) राखीव दिवशी होईल सामना
आयपीएलच्या नव्या नियमाप्रमाणे पावसामुळे आयपीएल फायनल मध्येच थांबवण्यात आली तर उद्या राखीव दिवशी, मॅच थांबली तिकडूनच सुरू होईल. टॉसनंतर एकही बॉल न टाकता मॅच थांबली तर राखीव दिवशी पुन्हा एकदा टॉस होईल.

3) पॉईंट्स टेबलमध्ये पुढे असलेल्या टीमला विजयी घोषित करण्यात येईल
राखीव दिवशीही पाऊस पडला तर सुपर ओव्हरच्या मदतीने मॅचचा निकाल लागेल. पावसामुळे सुपर ओव्हरही होऊ शकली नाही तर पॉईंट्स टेबलमध्ये पुढे असलेल्या टीमला विजयी घोषित करण्यात येईल. गुजरात टायटन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर होती. अशा प्रकारे पावसामुळे दोन्ही दिवस सामना होऊ शकला नाही तर गुजरातला विजयी घोषित करण्यात येईल.

हे पण वाचा

एकवीरेला चाललेल्या कारने बोरघाटात घेतला पेट, व्हिडिओ आला समोर

‘या’ देशात चक्क युरीनपासून बनवली जाते बिअर !!! तुम्ही ते पिण्याचे धाडस कराल का???

पेट्रोल पंपावर आग लागताच धावू लागले लोक, धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव

एका महिन्यात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 158.59% रिटर्न !!!

Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल