मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदाचा सीझन निराशाजनक गेला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाच्या आयपीएलमध्ये क्वालिफाय रेसमधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. त्यामध्येच आता मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाही.
त्यामुळे मुंबईने (Mumbai Indians) त्याच्या जागी उत्तराखंडचा मध्यमगती गोलंदाज आकाश मधवालला बदली म्हणून करारबद्ध केले आहे. सूर्यकुमारला त्याच्या डाव्या हाताच्या स्नायूला दुखापत झाल्याने बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईसाठी तीन अर्धशतकांसह 8 सामन्यांत 309 धावा करणारा सूर्यकुमार किमान चार आठवडे मैदानाबाहेर असणार आहे.
🚨 SQUAD UPDATE 🚨
Akash Madhwal replaces Suryakumar Yadav for the rest of the 2022 season.
Read more 👇#OneFamily #DilKholKe #MumbaiIndianshttps://t.co/mJsXkFAkbD
— Mumbai Indians (@mipaltan) May 16, 2022
कोण आहे आकाश मधवाल ?
मधवाल हा उजव्या हाताचा मध्यम-वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने 2019 मध्ये पदार्पण केल्यापासून क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडचे तीनही फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. आकाशची एमआय प्रीसीझन कॅम्पमध्ये सपोर्ट टीममध्ये सामील होण्यासाठी निवड करण्यात आली होती आणि गेल्या काही महिन्यांपासून त्याने त्याचे प्रदर्शन केले आहे. त्याला त्याच्या क्षमतेच्या जोरावर हि संधी मिळाली आहे.
हे पण वाचा :
Women T20 Challenge च्या तीन टीमची बीसीसीआयकडून घोषणा, भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडू टीममधून बाहेर
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे उर्वरित आयपीएल आणि इंग्लंड कसोटी दौऱ्यातून बाहेर
महिलेनं धावत्या ट्रेनमधून आधी मुलांना फेकलं, मग स्वतःदेखील घेतली उडी
…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र