‘या’ कारणामुळे Arjun Tendulkarला IPLमध्ये खेळवले नाही, मुंबईच्या कोचने सांगितली कमजोरी

Arjun Tendulkar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पाच वेळची चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा मोसम खूप निराशाजनक ठरला आहे. 15 वर्षांच्या आयपीएल इतिहासात मुंबई पहिल्यांदाच पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली. यावर्षी मुंबईला 14 पैकी फक्त 4 मॅच जिंकता आल्या. टीममध्ये असलेल्या 24 पैकी 21 खेळाडूंना मुंबईने खेळण्याची संधी दिली, पण सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मात्र अजून संधी मिळाली नाही. मुंबईने अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) लिलावामध्ये 30 लाख रुपयांना विकत घेतलं होतं.

अर्जुन (Arjun Tendulkar) हा डावखुरा फास्ट बॉलर आहे. मुंबईने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर अर्जुनचे (Arjun Tendulkar) बॉलिंग करतानाचे व्हिडिओ टाकले, यात अर्जुन अचूक यॉर्कर टाकताना दिसत आहे. अर्जुन तेंडुलकरचं 2022 हे मुंबई इंडियन्ससोबतचं दुसरं वर्ष होतं. मागच्या वर्षी झालेल्या लिलावात मुंबईने अर्जुनला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं, पण संधी मिळायच्या आधीच तो दुखापतीमुळे टीमबाहेर झाला होता.

मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच शेन बॉण्ड यांनी अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) या मोसमात का खेळवलं नाही, याचं कारण सांगितलं आहे. बॅटिंग आणि फिल्डिंग सुधारण्यासाठी अर्जुनला अजून बरंच ट्रेनिंग आणि कठोर परिश्रम करावे लागणार आहेत, असं शेन बॉण्ड यांनी सांगितले आहे. ‘अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) अजूनही बरंच काम करावं लागणार आहे. तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या टीमकडून खेळता तेव्हा स्क्वॅडमध्ये असणं वेगळं आणि प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं वेगळं. त्याला अजून बरंच सुधारावं लागणार आहे. त्याच्यावर अजून बरंच काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाला संधी दिली पाहिजे असं आपण म्हणतो, पण या लेव्हलला तुम्हाला तुमची जागा सिद्ध करून मिळवावी लागते. त्याला बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तो यात सुधारणा करेल आणि टीममध्ये स्थान कमवेल, अशी अपेक्षा आहे,’ असे शेन बॉण्ड म्हणाले आहेत.

हे पण वाचा :
अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!

कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!

मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान

आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा