आजपासून IPL ची रंगत; चेन्नई- गुजरात मध्ये पहिला सामना

ipl 2023 csk vs gt
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशभरातील क्रिकेटप्रेमीच लक्ष्य असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगची (IPL) सुरुवात आजपासून होणार आहे. यंदाच्या आयपीएलच्या या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) मध्ये होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता हा महामुकाबला होणार आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएल मधील यशस्वी संघ मानला जातो. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने मागील वर्ष आयपीएल चषकावर आपलं नाव कोरल आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दोन्हीही सामन्यात विजय मिळवला होता. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी चेन्नईला आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने आजचा सामना रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.

चेन्नई सुपर किंग्सकडे महेंद्रसिंह धोनी, डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड , अंबाती रायुडू असे फलंदाज आहेत तर बेन स्टोक, रवींद्र जडेजा, मोईन अली यांच्या रूपात तगडे अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजी विभागात महेश थिक्षणा, दीपक चहर, मुकेश चौधरी, सिसांडा मघाला यांच्यावर जबाबदारी असेल. दुसरीकडे गुजरात टायटन्स बाबतीत सांगायचं झाल्यास, शुभमन गिल, वृद्धिमान साहा, केन विलियम्सन, हार्दिक पांडया, डेव्हिड मिलर अशी जबरदस्त बॅटिंग ऑर्डर आहे. तर राशीद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल.

TV वर IPL 2023 चे सामने कसे पहाल ?

IPL 2023 मधील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण मागील हंगामाप्रमाणे यंदाही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. स्टार स्पोर्ट आपल्या प्रेक्षकांना HD आणि SD टेलिकास्टमध्ये सामन्याचे थेट प्रक्षेपण करेल. तसेच हे सर्व सामने तुम्हाला इंग्रजी, हिंदी आणि वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये पाहायला मिळतील.

IPL 2023 चे सामने ऑनलाइन कसे पाहू शकता ?

तुम्हाला जर मोबाईल वरून IPL 2023 चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहायचं असेल तर तुम्हाला मोबाईल मध्ये Jio Cinema हे अँप डाउनलोड करावं लागेल. Jio Cinema अॅपवर तुम्ही अगदी फ्री मध्ये IPL चे सामने पाहू शकाल.