हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या (IPL) 16 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. 2008 पासून सुरु झालेली ही क्रिकेट स्पर्धा संपूर्ण जगात नंबर वन आहे. देशभरातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपासून ते प्रायोजक म्हणून व्यावसायिकांपर्यंत या लीगशी संबंधित आहेत. याशिवाय, प्रत्येक सामन्यात तुम्हाला मैदानाबाहेर चीअरगर्लही पहायला मिळतात. फलंदाजांनी चौकार- षटकार मारल्यानंतर किंवा गोलंदाजाने विकेट घेतल्यांनंतर डान्स करून प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखी भर घालण्याचे काम या चिअरगर्ल्स करत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे की या चिअरगर्ल्सना दिवसाला किती पगार मिळतो? चला याबाबत आज आपण जाणून घेऊया
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अब्जावधी रुपयांच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये चीअरलीडर्सना मात्र मामुली रक्कम मिळते. मीडिया सूत्रांनुसार, आयपीएल सामन्यासाठी चीअरलीडर्सना 14,000 ते 17,000 रुपये मिळतात. वेगवेगळ्या संघानुसार चीअरलीडर्सच्या मानधनातही आपल्याला फरक पहायला मिळतो. CSK, पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल हे संघ चीअरलीडर्सना प्रति सामन्यासाठी 12,000 रुपये देतात. तर मुंबई इंडियन्स आणि आरसीबी प्रत्येक सामन्यासाठी 20,000 रुपये देतात. कोलकाता नाईट रायडर्स आपल्या चीअरलीडर्सना सर्वाधिक 24,000 रुपये प्रत्येक सामन्यासाठी देते. याशिवाय आपल्या कामगिरीनुसार किंवा संघ जिंकल्यास चीअरलीडर्सना अतिरिक्त बोनस सुद्धा मिळतो.
म्हाडा बांधणार 12724 घरे; कोणत्या शहरांत किती घरे मिळणार?
पहा सविस्तर आकडेवारी👉🏽 https://t.co/wp7UlsBKv1#Hellomaharashtra #mhada
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 8, 2023
खरं तर चीअरलीडर्स होणं हे काही सुखाचं काम नाही. वास्तविक, त्यांची नृत्य क्षमता पाहून त्यांची निवड चाचणी केली जाते. चीअरलीडर्सना अनेक तास सराव करावा लागतो. प्रत्येक सामन्यापूर्वी या चीअरलीडर्स हिंदी बॉलीवूड गाणी तसेच आपल्या संघाच्या थीम गाण्यांवर सराव करतात. यासाठी त्यांना डान्स शिकवण्यासाठी एक शिक्षक देखील दिला जातो, जो त्यांना सराव करण्यास मदत करतो.