IPL Media Rights: 44 हजार कोटींना टीवी-डिजिटल राइट्सची विक्री, ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या आयपीएलच्या मीडिया राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव सुरु आहे. 2023-27 या पाच वर्षांसाठी सामन्याचे प्रसारण अधिकार दिले जाणार आहेत. या ई-ऑक्शनमध्ये 410 सामन्यांसाठी एकूण 44,075 कोटी रुपयांना हे अधिकार (IPL Media Rights) विकले गेले आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पॅकेज ए म्हणजे टीवी राइट्स 23,575 कोटींना तर पॅकेज बी मध्ये डिजिटल राइट्स 20,500 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. म्हणजे टीवी राइट्समधून प्रति सामना 57.5 कोटी तर डिजिटल राइट्समधून प्रति मॅच 50 कोटी रुपये मिळणार आहेत.

टीवी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या एका सामन्यासाठी BCCI ला 107.5 कोटी रुपयांची रक्कम मिळेल. पुढच्या पाचवर्षांसाठी या राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव झाला आहे. 2017 साली स्टार इंडियाने आयपीएलचे प्रसारण हक्क मिळवण्यासाठी जितकी रक्कम मोजली होती, त्यापेक्षा अडीचपट किंमत यावेळी मोजावी लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलचे टीवी राइट्स सोनीजवळ तर डिजिटल राइट्स वायकॉम 18 म्हणजे रिलायन्सने मिळवले आहेत. याची अधिकृत घोषणा होणे अजून बाकी आहे.

पॅकेज सी आणि डी चा लिलाव बाकी आहे. पॅकेज सी मध्ये प्लेऑफसह लीगच्या 18 सामन्यातील नॉन एक्सक्लूसिव राइट्स आहेत. पॅकेड डी मध्ये भारतीय उपखंडाबाहेरील प्रसारण अधिकार आहेत. याचासुद्धा लिलाव (IPL Media Rights) आजच पार पडणार आहे. या लिलावात BCCIने एक मॅचमधून होणाऱ्या कमाईत लोकप्रिय फुटबॉल लीग इंग्लिशन प्रीमियर लीगला मागे टाकलं आहे. या फुटबॉल लीगमधील प्रती मॅच किंमत 81 कोटी रुपये आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी आयपीएलने हा आकाड पार केला होता आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हे पण वाचा :

शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने सांगितली कारणे

संजय राऊतांना जोकर म्हणणार नाही, पण ते….; फडणवीसांचा टोला

UPI द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतील हे जाणून घ्या

आमचा जन्म राजकारणासाठी झालेला नाही; अर्ज मागे घेताच सदाभाऊंची पहिली प्रतिक्रिया

‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात दिला अडीच पट नफा !!!