हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून आयपीएल 2021चा दुसरा सिझन चालू होणार असून पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज मध्ये होणार आहे. आयपीएल च्या पहिल्या सत्रात बलाढ्य मुंबईने चेन्नईला अटीतटीच्या लढतीत नमवले होते. त्यामुळे चेन्नई पराभवाचा वचपा काढणार की मुंबई पुन्हा एकदा बाजी मारणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.
भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
चेन्नईच्या अडचणी वाढल्या-
चेन्नईच्या संघाला पहिल्या सामन्यापूर्वीच काही धक्के बसले आहेत. कारण चेन्नईचा सॅम करन हा पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर चेन्नईचा ड्वेन ब्राव्हो हा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे पहिल्या सामन्यातही ब्राव्हो गोलंदाजी करण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे चेन्नईला पहिल्या सामन्यासाठी आपल्या संघात काही बदल करावे लागणार आहे. महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, फाफ डुप्लेसीस हे चेन्नईची बलस्थाने आहेत.
मुंबईचा संघ आहे बलाढ्य-
दुसरीकडे मुंबई इंडिअन्स चा संघ नेहमीप्रमाणे मजबूत आहे. कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, पंड्या बंधू, कायरन पोलार्ड, यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह यांसारख्या T20 स्पेशालिस्ट खेळाडूंमुळे मुंबईला हरवणे चेन्नईसाठी नक्कीच सोप्प नसेल.