१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये रंगणार आयपीएलचे सामने! बीसीसीआयची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआय अंतिम निर्णयापर्यंत पोहचलं आहे. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. दैनिक लोकसत्ताने पीटीआय वृत्तसंस्थेच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याचं समजतंय.

“१९ सप्टेंबर (शनिवारी) ला स्पर्धेला सुरुवात होईल तर ८ नोव्हेंबर (रविवार) ला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. ५१ दिवसांचा हा कालावधी सर्व संघमालक, ब्रॉडकास्टर्स आणि इतर सदस्यांसाठीही योग्य आहे.” ब्रिजेश पटेल पीटीआयला ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी आयसीसीने ऑस्ट्रेलियात प्रस्तावित टी-२० विश्वचषकाचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकललं आहे. यानंतर बीसीसीआयकडून आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment