वारंवार बोली लावूनही IPO चे अलॉटमेंट होत नसेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली । जर आपण 2021 च्या IPO मार्केटवर नजर टाकली तर या वर्षी अनेक नवीन IPO लिस्ट झाले आहेत. ज्यांनी गुंतवणूकदारांना दुप्पट किंवा तिप्पट रिटर्न दिला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक IPO ला उदंड प्रतिसाद मिळत आहे. काही IPO 100 पेक्षा जास्त वेळा सबस्क्राइब झाले आहेत. मात्र अनेकदा लोकं तक्रार करतात की, त्यांनी IPO साठी अप्लाय करतात, मात्र त्यांना कधीच मिळत नाही.

मात्र IPO चे अलॉटमेंट का होत नाही, असा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो तर IPO चे अलॉटमेंट कोणत्या प्रक्रियेअंतर्गत होते हे जाणून घेऊयात.

1. सेबीच्या नियमांनुसार, रिटेल गुंतवणूकदार IPO मध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतची बोली लावू शकतो. मात्र, त्यासाठी किमान बोली असणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की, जर IPO मध्ये 15 शेअर्सचा लॉट असेल तर तुम्हाला किमान 15 शेअर्ससाठी बोली लावावी लागेल.

2. तसेच एडलवाईस IPO फंडच्या रीपोर्ट्सनुसार, 2018 सालानंतर IPO मध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्या IPO मध्ये 15 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यांना सरासरी 13 पट जास्त सबस्क्रिप्शन मिळाले आहेत.

3. एडलवाईस IPO फंड हा 2018 मध्ये लाँच करण्यात आलेल्या अशा प्रकारचा पहिला थीमॅटिक फंड आहे. फंडाच्या माध्यमातून IPO काढणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. हा फंड नुकत्याच जारी केलेल्या IPO किंवा आगामी IPO मध्ये गुंतवणूक करतो. अलीकडच्या काळात, फंडाने अंबर एंटरप्रायझेस, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज, ग्लैंड फार्मा, झोमॅटो आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स यांसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

4. गुंतवणूकदाराने एकाच नावाने अनेक वेळा अर्ज करू नये. एका पॅन नंबरसह एका IPO साठी फक्त एकदाच अप्लाय करता येतो. तुम्ही एकाच पॅनसह अनेक अप्लिकेशन केल्यास ते इनव्हॅलिड मानले जाईल.

5. जर IPO चांगला दिसत असेल तर तुम्ही तुमच्या नावाने, तुमच्या पत्नीच्या नावाने, तुमच्या प्रौढ मुलाच्या नावाने आणि तुमच्या आई किंवा वडिलांच्या नावाने अर्ज करू शकता. यासाठी, वेगवेगळे पॅन ण्यम्बर असल्‍याने अलॉटमेंटची शक्यता वाढते. हे मल्टीपल अप्लिकेशन म्हणून मानले जात नाही.