नवऱ्याची खंबीर साथ अन 2 वर्षाच्या मुलाची आई बनली IPS अधिकारी; पुष्पलता यादव यांची यशोगाथा पहाच

Pushpalata Yadav success story
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील खुसबुरा या छोट्याशा गावात राहणाऱ्या पुष्पलता यादव या आज सर्व महिलांसाठी जिद्दीचे उत्तम उदाहरण बनल्या आहेत. त्या 2017 मध्ये UPSC  नागरी सेवा परीक्षा ऑल इंडियाच्या 80 व्या रँकमध्ये आलेल्या आहेत. पुष्पलता यादव यांनी लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या पाठिंब्याने ही रँक मिळवली आहे. यासाठी त्यांनी आपला संसार सांभाळत दिवसरात्र अभ्यास केला आहे. त्यामुळे त्या सर्व महिंलासाठी आज एक प्रेरणा बनल्या आहेत. आज आपण त्यांची संपूर्ण यशोगाथा पाहणार आहोत.

हरियाणाच्या खुसबुरा या छोट्याशा गावात रहिवासी असणाऱ्या पुष्पलता यांचे शिक्षण याच गावात पार पडले. पुढे त्यांनी 2016 मध्ये बीएससी पुर्ण केली. इथेच न थांबता त्यांनी आपले पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एमबीए ही पूर्ण केले. यानंतर त्या एक खाजगी कंपनीत रुजू झाल्या. हे करत असतानाच त्यांनी सरकारी नोकरीसाठी आपला अभ्यास सुरु केला. दोन वर्षांनी त्यांना स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

परंतु याच मधल्या काळात त्यांचे लग्न झाले. त्यामुळे त्यांचे काम आणि सुरु असलेला अभ्यास मध्येच थांबला. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाली. घरकामामुळे लता यांना पुस्तकांना हात देखील लावता येत नव्हता. मात्र तब्बल चार वर्षे उलटून गेल्यानंतर त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरु केली. आणि त्यात उत्तीर्ण देखील झाल्या. यासाठी त्यांच्या नवऱ्याने त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या नवऱ्याचे आणि कुटूंबाने त्यांना खूप प्रोत्साहन दिले. तसेच मुलांची संपूर्ण जबाबदारी नवऱ्याने उचलली. आज त्या प्रत्येक मुलाखतीत सांगतात की, माझ्या या यशामागे माझ्या नवऱ्याचा हात आहे.

आपल्याकडे लग्न झाले कि मुलींना शिक्षण घेता येत नाही. घरकाम आणि मुले यातच त्यांचे आयुष्य निघून जाते. मात्र पुष्पलता यांनी या सगळ्यावर मात करत आज एक उत्तम उदाहरण मांडले आहे. आज त्या एक IAS अधिकारी असून आपले कर्तव्य पार पाडत आहेत.