Valentine Day निम्मित जोडीदारासोबत करा थायलंडची टूर; IRCTC ने आणले आहे भन्नाट पॅकेज

IRCTC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जानेवारी महिना संपला की फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून साजरी केला जातो. कारण फेब्रुवारी महिन्याच्या 14 तारखेला प्रेमी युगल Valentine Day साजरी करतात. व्हॅलेंटाईन डेनिमित्त अनेकजण आपल्या प्रियसीला बायकोला घेऊन फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. त्यामुळेच अशा कपल्ससाठी IRCTC ने एक खास टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेजमार्फत तुम्ही थायलंडमध्ये 3 रात्री आणि 4 दिवस घालवू शकता.

व्हॅलेंटाईन डेनिमित्त IRCTC ने आणलेल्या पॅकेजमध्ये तुम्हाला पटाया आणि बँकॉक फिरता येणार आहे. हे पॅकेट 14 फेब्रुवारीपासून सुरू होईल. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला जवळपास 48,470 रुपये खर्च करावा लागणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइट तिकीट, जेवण, इतर आवश्यक सर्व सुविधा मिळणार आहेत. हे पॅकेज हैदराबादपासून सुरू होईल.

IRCTC पॅकेजविषयी अधिक माहिती

IRCTC च्या या पॅकेजचे नाव Treasures Of Thailand, Valentine’s Day Special Ex Hyderabad (SHO12) असे आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्हाला पटाया आणि बँकॉक येथे जाता येईल. ही टूर 14 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल, ज्यामध्ये तुम्हाला 4 दिवस आणि 3 रात्र घालवता येतील. या पॅकेज अंतर्गत तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण तसेच इतर सुविधा मिळतील. या पॅकेज अंतर्गत तुमचा संपूर्ण प्रवास फ्लाइटने होईल. हैदराबाद ठिकाणावरून तुमच्या या टूरला सुरुवात होईल.

टूर पॅकेजला खर्च किती येईल?

IRCTC टूर पॅकेज अंतर्गत तुम्ही एकटेच जात असाल तर तुम्हाला 56,845 रुपये इतका खर्च येईल. तसेच, 2 लोकांसाठी प्रति व्यक्ती 48,470 रुपये इतका खर्च येईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला मुलांसाठी बेडसह 46,575 रुपये आणि बेडशिवाय 41,550 रुपये इतका खर्च येणार आहे. त्यामुळे तुमच्या खर्चाचे गणित करून आजच या टूर पॅकेजसाठी बुकिंग करा.