हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळा ऋतू असल्याने अनेकजण पर्यटनाचा बेत आखत आहेत. वर्षभर काम करायचेच आहे त्यामुळे या महिन्यात फिरायला जायचंच, असे अनेकजण म्हणतायत. तरुण वर्ग सुन्दर अशा निसर्गरम्य ठिकाणी फिआर्यला जात आहेत तर वयोवृद्ध धार्मिक स्थळी. तुम्हालाही अशा धार्मिक स्थळ असलेल्या शंभू महादेवाच्या 5 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वेने खास टूर पॅकेज आणले आहे. पाहूया काय आहे ते….
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात IRCTC या भारतीय रेल्वेच्या उपक्रमाद्वारे एक विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. या टूरद्वारे भाविकांना खास पॅकेज देण्यात आले आहे. त्यामुळे भक्तांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहेत. तुम्हालाही महादेवाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही यात्रेला जाऊ शकता.
कधी होणार यात्रेला सुरुवात?
आयआरसीटीनुसार देण्यात येत असलेल्या टूर पॅकेजमध्ये यात्रेचा एकूण 9 दिवसांचा प्रवास असणार आहे. 4 फेब्रुवारीला यात्रेला सुरुवात होईल आणि 12 फेब्रुवारीला यात्रा संपेल. गुलाबी शहर जयपूर येथून प्रवास सुरू होईल. या प्रवासादरम्यान भाविकांना 5 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येणार आहे. तसेच एलोरा लेण्यांना भेट देऊ शकता येणार आहे.
कुठे-कुठे जाईल ट्रेन?
भाविकांची खास स्पेशल ट्रेन त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, नागेश्वर आणि सोमनाथ ज्योतिर्लिंगच्या ठिकाणापर्यंत जाणार आहे. हे ज्योतिर्लिंग अनुक्रमे वेरावल, नाशिक, द्वारका, पुणे आणि औरंगाबाद शहरात स्थित आहे. याशिवाय, भाविक द्वारकाधिश मंदिरमध्ये भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा दर्शन घेऊ शकतील.
काय मिळेल सुविधा?
शंभू महादेवाची यात्रा दोन विभागात विभागली आहे. पहिली सँडर्ड आहे. या विभागाचे भाडे 21 हजार 390 आहे. तर, दुसरे सुपीरियर आहे. याचे भाडे 24 हजार 230 ठेवण्यात आले आहे. मात्र, दोन्ही विभागातील भाविकांसाठी बससेवा नॉन-एसी आहे.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन
यावेळी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत ही यात्रा करण्यात येत आहे. ही ट्रेन जयपूरपासून रवाना होईल. यानंतर अजमेर, भीलवाडा आणि उदयपूरहून नाशिकला पोहोचेल. याठिकाणी भाविक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन करतील. दरम्यान, भाविक आयआरसीटीसीच्या वेबसाइट भेट देऊन तिकीट बुकिंग करू शकतात. याशिवाय, रेल्वेच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अधिक माहिती मिळवू शकतात.