हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC नेहमीच भारतीय प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि प्रवाशांच्या सोयीचे पॅकेज घेऊन येत असत आणि संपूर्ण भारतभर किंवा विदेशातही स्वस्तात प्रवास करण्याची संधी देत असत. आताही IRCTC ने आपल्या प्रवाशांसाठी एक जबरदस्त टूर पॅकेज आणलं आहे. याअंतर्गत तुम्ही अगदी स्वस्तात थेट थायलंड फिरू शकणार आहात . हा प्रवास ६ दिवसांचा असणार असून यासाठी तुम्हाला 51,100 खर्च मोजावा लागणार आहे.
तसा विचार केला तर थायलंडमध्ये प्रवास करणे खूप स्वस्त आहे आणि जगातील इतर देशांच्या तुलनेत थायलंडमध्ये प्रवास करण्यासाठी जास्त खर्च सुद्धा येत नाही. आणि त्यातच महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे भारतीयांना व्हिसाचे टेन्शन घेण्याचीही गरज नाही, थायलंडमध्ये आल्यावरही तुम्ही व्हिसा ऑन अरायव्हल घेऊ शकता.
कधीपासून सुरु होणार टूर पॅकेज
IRCTC चे हे टूर पॅकेज 11 ऑगस्ट 2023 पासून कोलकाता येथून सुरू होत आहे. हे IRCTC चे फ्लाइट टूर पॅकेज असून तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळत आहे. IRCTC चे हे थायलंडचे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसाचे आहे. या पॅकेज अंतर्गतच तुम्हाला बँकॉक आणि पट्टायालाचा प्रवासही करता येणार आहे. थायलंड मध्ये बघण्यासारखं बरच काही असल्याने तुम्ही अगदी स्वस्तात विविध गोष्टींचे दर्शन घेऊ शकता.
विशेष म्हणजे हा प्रवास करत असताना तुम्हाला खाण्यापीण्याची सुद्धा कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण तुमच्या जेवणाखाण्याची सोया सुद्धा IRCTC च करणार आहे. येव्हडच नव्हे तर जेव्हा तुम्ही थायलंडमध्ये उतराल तेव्हा संपूर्ण स्थानिक परिसर पाहण्यासाठी तुम्हाला कॅबची सुविधाही मिळत आहे. जर तुम्ही एकटे थायलंडला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 51,100 रुपये खर्च पडेल आणि दोघे असाल तर प्रतिव्यक्ती 43,800 रुपये द्यावे लागतील.