IRCTC Tour Packages : फक्त 14,300 रुपयांत करा दक्षिण भारताची सफर; IRCTC चे परवडणारे टूर पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IRCTC Tour Packages दक्षिण भारतात अनेक प्रसिद्ध देवस्थान आहेत. त्यामुळे आयुष्यात एकदातरी भाविक आवर्जून रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारीला भेट देण्यासाठी जात असतात. मात्र काही वेळा अनेकांची ही इच्छा अपूर्ण राहत असते. प्रवासाची योग्य माहिती नसल्यामुळे अनेकजण दर्शनासाठी जाणे टाळतात. परंतु आता IRCTC ने आणलेल्या टूर पॅकेजमुळे या देवस्थानांना भेट देणे सहज शक्य होणार आहे.

भारतीय रेल्वेकडून भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे ‘ज्योतिर्लिंग दिव्य दक्षिण यात्रा’ टूर काढण्यात आली आहे. या पॅकेजद्वारे तुम्हाला तिरुवन्नमलाई, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, त्रिची आणि तंजावरला भेट देण्याची संधी मिळणार आहे. ज्यांची आजवर या ठिकाणी जायची इच्छा अपूर्ण राहिली आहे त्यांच्यासाठी IRCTC ने ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

IRCTC ने आणलेल्या टूर पॅकेजची (IRCTC Tour Packages) किंमत फक्त १४,३०० रुपयांपासून सुरू होत आहे. या टूर पॅकेजची माहिती IRCTC ने ट्विट करून दिली आहे. ही टूर सिकंदराबाद येथून ९ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू होणार आहे. या टूर पॅकेजमध्ये IRCTC खाणे, पिणे, राहणे अशा सर्व सोयी उपलब्ध करून देणार आहे. तसेच, तिथे गेल्यानंतर देखील सर्व सुविधा राबविण्यात येतील.

टूर पॅकेजची माहिती- (IRCTC Tour Packages)

IRCTC ने आणलेल्या पॅकेजचे नाव “ज्योतिर्लिंग दिव्य दक्षिण यात्रा” असे आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला तिरुवन्नमलाई, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, त्रिची आणि तंजावर अशा सर्व ठिकाणी भेट देता येणार आहे. ही टूर 8 रात्री आणि 9 दिवसांची असेल. येत्या, 9 ऑगस्ट 2023 रोजी ही टूर निघणार आहे.

या टूरमध्ये सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असे सर्व काही मिळेल. टूरसाठी निघालेले प्रवासी सिकंदराबाद, काझीपेट, वारंगल, खम्मम, विजयवाडा, तेनाली, ओंगोल, नेल्लोर, गुडूर आणि रेनिगुंटा या स्थानकावरून बोर्डिंग आणि डिबोर्डिंग करु शकतील. टूरचा प्रवास भारत गौरव पर्यटक ट्रेनने केला जाईल. या सुविधांसह इतर काही विशेष सुविधा देखील प्रवाशांसाठी पुरवण्यात येतील.

खर्च आणि बुकिंग

तुम्हाला IRCTC वेबसाइटच्या irctctourism.com वर जाऊन या टूर पॅकेजसाठी बुकिंग करता येणार आहे. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल. जर तुम्हाला स्लीपरमध्ये प्रवास करायचा असला तर त्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती १४,३०० रूपये मोजावे लागतील. तसेच थर्ड एसीसाठी प्रति व्यक्ती २१,९०० रुपये भरावे लागतील. त्यासोबतच, सेकंड एसीमध्ये प्रवास करायचा असला तर प्रति व्यक्ती २८,५०० रुपये भरावे लागतील.