हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC Tour Package : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या IRCTC कडून भारतातील धार्मिक स्थळांना भेट देण्याची जबरदस्त संधी मिळत आहे. यासाठी IRCTC कडून एक पॅकेज लाँच केले जाणार आहे. या पॅकेज अंतर्गत नागरिकांना अयोध्या, प्रयागराज, वैष्णोदेवी आणि वाराणसी इत्यादी ठिकाणांना भेट देता येईल. हे जाणून घ्या कि, IRCTC कडून अयोध्येपासून माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आलिशान आणि कमी दरात ट्रेनचे टूर पॅकेज दिले जात आहे.
IRCTC च्या या टूर पॅकेज अंतर्गत नागरिकांना 10 रात्री 11 दिवस राहायला मिळतील. या पॅकेज अंतर्गत जो प्रवास आहे, तो आसाममधील दिब्रुगड येथून सुरू होणार आहे. या पॅकेजची खास बाब अशी कि, यामध्ये आपल्याला खाण्यापिण्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण हा संपूर्ण प्रवास भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून केला जाणार आहे. या स्पेशल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना दिब्रुगढ, मारियानी, लुमडिंग, गुवाहाटी, न्यू कूचबिहार, न्यू जलपाईगुडी आणि कटिहार स्थानकांवर उतरता येईल. IRCTC Tour Package
Indulge in spirituality by exploring Ayodhya Ram Mandir Trail with Vaishno Devi by Bharat Gaurav Train. Relax in air-conditioned comfort while discovering the cultural and religious heritage of India. Hurry!
Book Today https://t.co/zMhde7yPVH
— IRCTC Bharat Gaurav Tourist Train (@IR_BharatGaurav) March 30, 2023
या टूर पॅकेजची वैशिष्ट्ये जाणून घ्या (IRCTC Tour Package)
पॅकेजचे नाव- वैष्णोदेवीसहीत अयोध्या राम मंदिर मार्ग (EZBG02)
कव्हर केली जाणारी स्थाने – अयोध्या, प्रयागराज, वैष्णो देवी आणि वाराणसी
किती दिवस – 10 रात्री आणि 11 दिवस
निघण्याची तारीख – 27 मे 2023
प्रवास मोड – ट्रेन
बोर्डिंग/डिबोर्डिंग – दिब्रुगढ, मारियानी, लुमडिंग, गुवाहाटी, न्यू कूचबिहार, न्यू जलपाईगुडी आणि कटिहार
किती भाडे द्यावे लागेल ?
हे लक्षात घ्या कि, या टूर पॅकेज अंतर्गत असणारे दर बदलतील. जे प्रवाशाने निवडलेल्या श्रेणीनुसार असेल. 20,850 रुपये प्रति व्यक्ती पासून हे पॅकेज सुरू होईल. तसेच जर आपण इकॉनॉमी क्लासने प्रवास केला तर यासाठी 20,850 रुपये मोजावे लागतील. तसेच स्टॅण्डर्ड श्रेणीचे पॅकेज घेतल्यास प्रति व्यक्ती 31,135 रुपये द्यावे लागतील. IRCTC Tour Package
अशा प्रकारे करा बुकिंग
या टूर पॅकेजसाठी IRCTC ची वेबसाइट http://irctctourism.com वर जाऊन बुकिंग करावे लागेल. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल. IRCTC Tour Package
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctctourism.com/tourpacakage_search?searchKey=Vaishno%20
हे पण वाचा :
Tips and Tricks : घरातील घाण झालेली स्विच बोर्डची बटणे फक्त 10 रुपयांर करा स्वच्छ
TATA च्या ‘या’ 2 गाड्यांमध्ये दिले जाणार CNG किट, इलेक्ट्रिक व्हर्जनही लवकरच होणार लॉन्च
Mahindra Motors : ही गाडी तुम्हाला झोपूनच देत नाही; ड्रायव्हरला डुलकी लागली की वाजतो Alarm
Apple वाजवणार गुगलचा बँड! Pixel 7a ला टक्कर देण्यासाठी लाँच करणार कमी किंमतीचा iPhone SE 4
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा