हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : आपल्याकडून बऱ्याचदा छोट्याश्या रकमेमुळे होणाऱ्या नुकसानीकडे कानाडोळा केला जातो. अशा वेळी आपण विचार करतो की जाऊ देत… एवढ्याशा पैशांसाठी त्रास कशाला करून घ्या… मात्र जगात अशीही काही लोकं आहेत जे त्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीपेक्षा तत्वांचा आणि अधिकारांचा जास्त विचार करतात. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये राजस्थानमधील कोटा येथे राहणाऱ्या सुजित स्वामी नावाच्या एका व्यक्तीने फक्त 35 रुपयांसाठी रेल्वेशी तब्ब्ल 5 वर्षे लढा दिला आणि तो जिंकलाही…
आता त्यांच्या या लढ्याचा फायदा देशातील आणखी 2.98 लाख लोकांना देखील होणार आहे. या सर्व लोकांना रेल्वेकडून 2.43 कोटी रुपये परत केले जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वांत आश्चर्यकारक ठरणारी गोष्ट कोणती ??? तर… त्यांना 2 वर्षात 33 रुपये तर मिळाले मात्र उरलेल्या 2 रुपयांसाठी त्यांना आणखी 3 वर्षे लढावे लागले.
वास्तविक, 7 एप्रिल 2017 रोजी स्वामी यांनी गोल्डन टेंपल मेलचे कोटापासून दिल्लीपर्यंतचे तिकीट बुक केले होते. त्यांचा प्रवास 2 जुलै पासून सुरु होणार होता, मात्र प्लॅन बदलल्याने त्यांनी आपले तिकीट रद्द केले. देशभरात 1 जुलै 2017 पासून GST ची नवीन सिस्टीम लागू करण्यात आली होती, मात्र त्यांनी तिकीट त्यापूर्वीच रद्द केले होते. हे तिकीट 765 रुपयांचे होते आणि त्यातील 100 रुपये वजा करून त्यांना 665 रुपये परत दिले गेले होते.
सुजित स्वामी यांच्या म्हणण्यानुसार, IRCTC कडून तिकीट कॅन्सलेशन चार्ज म्हणून 65 रुपये कापले जायला हवे होते, मात्र त्यांनी सर्व्हिस चार्ज म्हणून 35 रुपये जास्त कापले. यानंतर स्वामी यांनी माहितीच्या अधिकाराखाली लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी 50 RTI (माहितीचा अधिकार) दाखल केला. तसेच चार सरकारी विभागांना पत्रे देखील लिहिली. त्यांच्या या RTI ला उत्तर देताना IRCTC ने त्यांचे 35 रुपये परत केले जातील असे सांगितले होते. यानुसार त्यांना 1 मे 2019 रोजी 33 रुपये परत करण्यात आले, मात्र यावेळी पुन्हा 2 रुपये कापण्यात आले. ज्यानंतर पुढील 3 वर्षे हे 2 रुपये परत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि रेल्वेकडून त्यांना 2 रुपये देखील परत केले गेले.
सुजित स्वामी यांनी पुढे सांगितले की, पैसे परत करण्याच्या मागणीसाठी त्यांना वारंवार ट्विट करावे लागले. यावेळी त्यांनी पंतप्रधान, रेल्वे मंत्री, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, GST कौन्सिल तसेच अर्थ मंत्रालय यांनाही हॅशटॅग केले. यानंतर IRCTC ने त्यांच्या RTI ला दिलेल्या उत्तरात असे म्हटले आहे की, तिकिट रद्द करण्यावर GST लागू होण्यापूर्वीचा सर्व्हिस टॅक्स कापून घेतलेल्या 2.98 लाख प्रवाशांना 35-35 रुपये परत केले जातील.
रेल्वेशी तिकीट बुकिंग संबंधित अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/
हे पण वाचा :
FD Rates : आता ‘या’ NBFC च्या स्पेशल FD वर मिळणार 7.45% व्याज !!!
Inflation : होम लोनपासून ते इन्शुरन्सपर्यंत जूनमध्ये ‘या’ गोष्टींसाठी मोजावे लागणार जास्त पैसे !!!
Aadhar Card चा गैरवापर टाळण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती !!!
Interest Rates : आता ‘या’ फायनान्स कंपनीकडून आपल्या FD वरील व्याजदरात वाढ !!!