चायनीजमध्ये असलेलं अजिनोमोटो खरंच आरोग्यासाठी सुरक्षित आहे का??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खाण्याचे अनेक शौकिन असतात. आणि त्यात चायनीज फूड म्हंटल की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत. त्यात नूडल्स हे लहाना पासून ते मोठ्या पर्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न. परंतु तुम्हाला माहितीये का चायनीज फूड एवढं टेस्टी का लागत? कारण त्यात अजिनोमोटो (Ajinomoto) ह्या मसाल्याचा समावेश असतो. आता हे कुठे बनते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? हे जाणून घेऊयात.

काय आहे अजिनोमोटो?

अजिनोमोटो हे जपानमध्ये तयार केले जाते. अजिनोमोटो हे एक सोडीयम आणि ग्लुटामीक ऍसिडपासून बनवले जाते. जे की नैसर्गिकरित्या आढळणारे अमीनो ऍसिड आहे. अजिनोमोटो प्रमाणेच एमएसजी आहे. ह्यामध्ये साखर, बीट, ऊस, सोडीयम, कॉर्न यासारख्या वनस्पतीद्वारे ते तयार केले जाते. हे आशिया खंडातील महत्वाचे खाद्यपदार्थ आहे जो साधारणपणे नूडल्स, तळलेले तांदूळ, सूप इत्यादींमध्ये जोडले जाते.

काय आहे ह्या अजिनोमोटोचा इतिहास?

अजिनोमोटो हे जापानमधील एक उत्पादन आहे. जे 1908 साली एका रसायनशास्त्रज्ञाने अन्नाला चव यावी म्हणून एका प्रयोगात वापरले होते. त्यानंतर त्याने कोंबूपासून एक विशिष्ट चव तयार करून ह्या स्वादात भर घालण्यासाठी एक नवीन पदार्थ तयार केला. जो एक प्रकारचा खाण्यायोग्य समुद्री शैवाल आहे. त्यानंतर अजिनोमोटो नावाच्या कंपनीने MSG ला विक्री करण्यासाठी ठेवले आणि आज हे प्रत्येक चायनीज पदार्थात वापरले जाते.

हे खरोखर आरोग्यासाठी योग्य आहे का?

अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA ने एका रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे अजिनोमोटो किंवा MSG हे आरोग्याला हानिकारक नाही. 100 वर्षांपूर्वीचा शोध लागल्यापासून ह्याचा एक खाद्यपदार्थ आणि मसाला म्हणून अनेक वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये सुरक्षितपणे वापर केला जात आहे. ह्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट आहे. हे एक नैसर्गिकरित्या उद्भवणारे अमीनो आम्ल आहे जे अनेक पदार्थांची चव वाढवते. आपण खाणाऱ्या रोजच्या जीवनातील फळभाज्या टोमॅटो तसेच द्राक्षे, चीज, मशरूम आणि इतर पदार्थांमध्ये MSG नैसर्गिकरित्या आढळते. त्यामुळे हे आरोग्यासाठी योग्य आहे. मात्र तज्ञ सांगतात की ह्याचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास ते हृदयावर परिणाम करू शकते.