हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतीही पगारदार व्यक्ती Public Provident Fund अंतर्गत PPF खाते उघडू शकते. तसेच या अंतर्गत पालक आपल्या अल्पवयीन मुलांचे देखील खाते उघडू शकतात. आता यामध्ये अशा प्रश्न समोर उभा राहतो कि, पगारदार व्यक्तीला आपल्या अल्पवयीन मुलांचे खाते उघडून कर सवलत (Tax Benefits) घेता येईल का ? याविषयी इन्कम टॅक्सचे नियम काय म्हणतात ते जाणून घ्या …
इन्कम टॅक्सच्या नियमां प्रमाणे PPF खात्यांत 1.50 लाख रुपये जमा केल्यावर Public Provident Fund Scheme, 2019 अंतर्गत टॅक्स सूट मिळते. यामध्ये अल्पवयीन मुलांच्या खात्यात जमा केलेले पैसे देखील समाविष्ट आहेत. म्हणजेच आपल्या या दोन्हीही खात्यांमध्ये मिळून जमा असलेली एकूण 1.50 लाख रुपयांची रक्कम ही कर सवलतीसाठी पात्र असेल.
इन्कम टॅक्सच्या कलम 10(11) च्या तरतुदींनुसार, PPF खात्याद्वारे मिळणाऱ्या व्याजासह वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे मिळणारे उत्पन्न हे करपात्र नाही. मात्र जर तुम्ही आपल्या अल्पवयीन मुलांसाठी देखील PPF खाते उघडले असेल तर त्या खात्यातून मिळणाऱ्या व्याजाचा तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये उल्लेख करणे गरजेचे असेल. येथे ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कि, तुमच्या अल्पवयीन मुलाच्या PPF खात्याद्वारे मिळणारे उत्पन्न हे पालकांच्या उत्पन्नाशी जोडले जाईल.
जर तुमची पत्नी टॅक्स भरत असेल तर ती देखील आपल्या पगारातून PPF खात्यामध्ये1.50 लाख रुपये वार्षिकरित्या जमा करून टॅक्स सुटीचा लाभ घेऊ शकते. मात्र ही सूट मिळवण्यासाठी तिला इनकम टॅक्स रिटर्न दाखल करावा लागेल.