हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक लोकांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज चा त्रास असतो. त्यामुळे आहारात कोणते पदार्थ खावं आणि कोणते नको असा प्रश्न त्यांना पडत असतो. त्यातच डॉक्टरही काही पथ्ये पाळायला सांगतात. शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी नेमकं काय खावं यामध्ये रुग्णांचा गोंधळ असू शकतो. आज आपण जाणून घेऊया की रोजच्या वापरातील बटाट्याचे सेवन मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी करावं की नाही याबाबत….
खरं तर बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शुगर लेव्हलला वाढवणारे कार्ब्स असतात. याशिवाय याला हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड देखील मानले जाते, म्हणजे असे कार्ब्स जे शरीरात पटकन शोषले जातात आणि रक्तातील साखर वाढवतात. याची काळजी न घेतल्यास मधुमेहामुळे हृदयविकार, पक्षाघात, किडनीचे आजार असे आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मधूमेहाच्या रूग्णांना बटाटा खाण्याआधी फार विचार करावा लागतो.
बटाटा खाताना घ्या ही काळजी-
मधुमेहाचे रुग्ण रक्तातील साखरेसाठी मानक आहाराचा भाग म्हणून बटाटा खाऊ शकतात, परंतु त्यांना फक्त त्यांच्या खाण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. म्हणजे, मधूमेहाचे रूग्ण असल्यास बटाटा अशा भाज्यांसह खा ज्यात फॅट, प्रोटीन, विटॅमिनचं प्रमाण जास्त असेल. तसेच बटाट्याच्या डिशऐवजी मीठ, तेल, मलई, चीज घालून हेल्दी स्वरूपात खावे. मधुमेह असलेले रुग्ण हे भाज्या, मांस, मासे आणि कडधान्यांसह देखील खाऊ शकतात. मात्र बटाट्याच्या चिप्स, फ्राइज किंवा तळून खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.