Wednesday, June 7, 2023

खोका तसाच राहिलाय, फक्त…; राणा- बच्चू कडू वादावर आंबेडकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यात खोक्यावरून वाद सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याने दोन्ही नेत्यांनी वाद संपल्याचे जाहीर केले. मात्र, या वादावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद म्हणजे खोका तसाच राहिला फक्त आरोपावरती पडदा पडला, असे म्हणत आंबेडकरांनी टोला लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर हे सध्या अकोल्याच्या दौऱ्यावर असून ते दहा दिवस विदर्भात असणार आहेत. विदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे आणि छोट्या सभांना ते हजेरी लावणार आहेत. दरम्यान आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर विचारला. त्यावर ते म्हणाले की, दोघांच्यातील हा वाद म्हणजे खोका तसाच राहिला फक्त आरोपावरती पडदा पडला आहे.

दरम्यान, आंबेडकर हे आज जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार असून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. राणा व बच्चू कडू यांच्यातील वादावर प्रतिक्रिया देत आंबेडकरांनी दोघांना खोचक टोला लगावला आहे.