हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी Provident Fund हि सुविधा १९५२ पासून सुरु करण्यात आली. याअंतर्गत कर्मचारी जिथे काम करत आहेत तिथून कर्मचाऱ्याच्या पगारातुन छोटासा भाग घेऊन तो प्रोविडेंट खात्यात जमा केला जातो. म्हणजेच मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या १२% रक्कम दरमहा EPF मध्ये जमा केली जाते. त्याचा फायदा थेट कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर होतो. पण कधीतरी काही करणास्तव कर्मचाऱ्यांना तो फंड आधी काढावा लागतो. कालावधीच्या आधी पैसे काढल्यामुळे त्यावर टॅक्स द्यावा लागतो का? याबाबत अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतात. आज आम्ही तुम्हाला PF चे पैसे काढल्यानंतर टॅक्स द्यावा लागतो का? आणि त्याचे नियम काय आहेत याबाबत माहिती सांगणार आहोत.
कधी द्यावा लागेल टॅक्स –
पाच वर्षाच्या कालावधीच्या आधी PF काढल्यास –
जर तुम्ही तुमचे प्रोविडेंट फंडच्या खात्यावरील पैसे ५ वर्षानंतर काढत असाल तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही. म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी तो टॅक्स फ्री असणार आहे. पण जर का तुम्हाला तुमचे पैसे ५ वर्षाच्या कालावधीच्या आधीच काढायचे असतील तर त्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल.
PAN Card हे PF खात्याला लिंक नसेल –
तुमच्या प्रोविडेंट फंडाच्या अकाउंटला जर PAN Card लिंक असेल तर TDS रेट १० % असेल. पण तुमचे PAN Card हे PF खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला डबल TDS द्यावा लागेल. त्या रेटचे प्रमाण २० % असे होईल. तुमचा TDS त्या रेटच्या प्रमाणात कट होतील .
खालील घटना घडल्यास अशा वेळी TAX लावला जात नाही –
आरोग्य बिघडले असेल तर –
कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडले असेल आणि त्यांना PF चे पैसे काढायचे असतील तर कंपनी त्यांना कोणताही टॅक्स लावत नाही. म्हणजे ते आरोग्याच्या कारणामुळे PF चे पैसे कालावधीच्या आधी काढू शकतात .
कंपनी बंद पडल्यास –
तुम्ही काम करत असलेली कंपनी कोणत्या तरी कारणास्तव बंद पडली असेल किंवा मालकाने कंपनी बंद केली असेल तर तुम्हाला त्या PF वर टॅक्स द्यावा लागणार नाही.
कंपनी सोडल्यास –
कर्मचाऱ्यांनी त्याची कंपनी सोडून दुसरी नोकरी करण्यास सुरुवात केली आहे. तर तो पूर्वीच्या कंपनीच्या PF खाते नवीन कंपनीमध्ये मर्ज करू शकतो. त्यामुळे त्याचा टॅक्स कट होणार नाही .