औरंगाबादेत कायद्याचा धाक संपला ? 18 वर्षीय तरुणाचे डोके ठेचून ‘मर्डर’

औरंगाबाद – शहरातील कांचनवाडी भागात एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या हत्येमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था धाब्यावर असल्याचे उघडकीस आले आहे. वारंवार होणाऱ्या या गंभीर गुन्ह्यांमूळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कांचनवाडी भागातील एका वाईन शॉपच्या समोरच्या गल्लीत महेश दिगंबर काकडे (१८, रा. नक्षत्रवाडी) या युवकाचा धारधार शस्त्राने खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपुसून औरंगाबाद शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेल्या अवस्थेत आसपासच्या लोकांनी पाहिले. जखमी महेश काकडे याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी महेश काकडेला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. ही घटना दारूच्या वादातून घडली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान महेशचा खून कोणी केला ? कोणत्या शस्त्राने केला ? खुनाचे कारण काय ? याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कराडे हे करित असून यासंबंधी प्रत्यक्षदर्शी आणि मृताच्या कुटुंबाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. औरंगाबाद शहरात अशा प्रकारे हत्येच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे तरुणांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

You might also like