मुद्रा योजनेअंतर्गत 1999 रुपये जमा केल्यावर सरकार देते 10 लाख कर्ज, याविषयीचे अधिक तपशील जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकारने लहान उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली आहे. या अंतर्गत लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अल्प प्रमाणात कर्ज दिले जाते. आता काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार फक्त 1999 रुपये जमा केल्यावर 10 लाखांपर्यंतचे कर्ज देत आहे. चला तर मग या मेसेजमागचे सत्य जाणून घेऊयात …

व्हायरल मेसेजमागचे सत्य असे आहे
व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार मुद्रा योजनेंतर्गत 1999 रुपयांचे इंटरनेट बँकिंग शुल्क जमा केल्यावर 2% व्याजदराने कर्ज देत आहे.

सरकारने मेसेज फेक असल्याचे सांगितले
पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून या बातमीची सत्यता सांगितली आहे. पीआयबीने आपल्या ट्विटरवरून इशारा दिला आहे की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत असे कोणतेही पत्र जारी करण्यात आलेले नाही. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे.

पीएम मुद्रा योजना काय आहे ते जाणून घेऊयात
मुद्रा योजनेअंतर्गत गॅरेंटीशिवाय कर्ज उपलब्ध आहे. याशिवाय या कर्जासाठी सरकारकडून कोणतेही प्रोसेसिंग चार्ज घेतले जात नाही. मुद्रा योजनेतील कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. योजनेअंतर्गत कोणतेही निश्चित व्याजदर नाहीत. मुद्रा कर्जासाठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. साधारणपणे किमान व्याज दर 12% असतो.

या योजनेत 3 प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे
1. शिशु कर्ज: 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज शिशू कर्ज अंतर्गत दिले जाते.
2. किशोर कर्ज: किशोर कर्ज अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
3. तरुण कर्ज: तरुण कर्ज अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

Leave a Comment