जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का ? : प्रवीण दरेकरांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाने सर्वत्र हाहाकार मजवला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे आता लसीकरण वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी आज राज्य सरकारच्यावतीने बैठक घेण्यात आली. तर दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढायले आहे. या महापालिकेने घेतलेल्या निर्णयावरून आता भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“महाविकास आघाडी सरकार ग्लोबल टेंडरकरता केंद्राकडे परवानगी मागते आहे आणि त्याचवेळी महापालिकेला स्वतः मंजुरी देतेय ? यांचं गौडबंगाल काही कळत नाही! जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का ?,” असा सवाल ठाकरे सरकारला विरोधी पक्षनेते दरेकरांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

राज्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूत दररोज वाढ होत आहे. मृत्यूची संख्या तसेच कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता राज्य सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. नागरिकांनी घर्रबाहेर पडू नये म्हणून कठोर निर्बंधही लादलेले आहेत. कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसींचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. हे लक्षात घेत ग्लोबल टेंडर लकाढण्याचा निर्णय मुंबई महापालिका व महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यानुसार आता महापालिकेस या टेंडरद्वारे तब्बल १ कोटी लसी प्राप्त होणार आहेत.

महापालिकेने घेतलेल्या ग्लोबल टेंडरच्या निर्णयावरून व महाविकास आघाडी सरकारने केंद्राकडे ग्लोबल टेंडर करीत परवानगी मागितल्याचा कर्णावरीन आता विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सवालही उपस्थित केले आहेत. दरेकरांनी उपस्थित केलेल्या सवालानंतर आता भाजपमधील इतर नेत्यांकडूनही मुंबई महापालिका व महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले जाणार हे निश्चित आहे.

Leave a Comment