सोन्यामध्ये गुंतवणूकीची ‘ही’ योग्य वेळ आहे का ? तज्ज्ञ म्हणतात कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सोन्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यातच आत अक्षय तृतीया जवळ आली आहे. अक्षय तृतीया हे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानले जाते. तसेच या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. सोने हे भरभराटीचे लक्षण मानले जाते. सध्या बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण पहायला मिळते आहे. अशा परिस्थितीत सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसे पहिले तर मल्‍टीकमोडिटी एक्‍सचेंज (MCX) वर गेल्या काही सत्रांमध्ये घसरण पाह्यला मिळत आहे. या दरम्यान सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम मागे 1,800 रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास तिथेही सोन्याच्या किंमती गेल्या महिन्यापासून कमी झाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत कि सोन्यामध्ये आता केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल का ?

याबाबत कमोडिटी एक्‍सपर्ट म्हणतात कि, मनात कोणतीही शंका न घेता सोन्यामध्ये बिनधास्तपणे गुंतवणूक करावी. कारण येत्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात जोरदार वाढ पहायला मिळेल. रशिया आणि युक्रेन मधील युद्धामुळे सोन्याच्या किंमती मध्यन्तरी वाढलेल्या होत्या. मात्र काही काळानंतर त्यामध्ये जोरदार घसरण झाली आणि आता त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. तसेच 2022 मध्ये सोन्याच्या किंमती 58 ते 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास जाण्याची शक्यता देखील आहे. रशिया आणि युक्रेन मधील युद्धामुळे सध्या भारतात किरकोळ महागाई वाढतच आहे, ज्यामुळे सोन्याच्या किंमतीही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र युद्ध बंद जरी झाले किंमती 50 हजार रुपयांच्या खाली येणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केलं