ईशान किशनची कमाल!! बांगलादेश विरुद्ध द्विशतकी खेळी

ishan kishan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर ईशान किशनने धडाकेबाद द्विशतक झळकावले. वन डे मध्ये भारताकडून द्विशतकी खेळी करणारा किशन सचिन, सेहवाग आणि रोहित शर्मा नंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे. अवघ्यां १२६ चेंडूत डबल सेंचुरी लगावत किशनने ख्रिस गेलचाही रेकॉर्ड तोडला.

कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू न शकल्याने ईशान किशनला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोन करत किशनने दमदार द्विशतकी खेळी केली. आपल्या या ऐतिहासिक खेळीदरम्यान किशनने १३१ चेंडूत २१० धावा काढल्या. यावेळी त्याने २४ चौकार आणि १० षटकार ठोकले. सर्वात कमी वयात द्विशतकी खेळी करण्याचा विक्रमही ईशान किशनने केला आहे. ईशान किशनचे वय अवघे २४ वर्ष आहे.

भारताकडून यापूर्वीच द्विशतक ठोकणारे फलंदाज

रोहित शर्मा 264 श्रीलंका 2014
वीरेंद्र सहवाग 219 वेस्टइंडीज 2011
रोहित शर्मा 209 ऑस्ट्रेलिया 2013
रोहित शर्मा 208 श्रीलंका 2017
सचिन तेंडुलकर 200* दक्षिण अफ्रीका 2010