भारतीय संघाला मोठा झटका!! ‘या’ खेळाडूला सरावादरम्यान दुखापत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (ICC Cricket World Cup 2023) सुरु असून क्रिकेटप्रेमीमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) सुद्धा दमदार कामगिरी करत सलग ८ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतच यंदा विश्वचषक स्पर्धा जिंकणार अशी आशा चाहते बाळगून आहेत. परंतु याच दरम्यान भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा विकेटकिपर फलंदाज ईशान किशनला (Ishan Kishan) दुखापत झाली आहे.

१२ नोव्हेंबरला भारताचा सामना नेदरलँड विरोधात आहे. तत्पूर्वी सराव करत असताना जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) गोलंदाजीवर शॉर्ट पिच बॉल मारण्याच्या नादात इशान किशन दुखापतग्रस्त झाला. बुमराहने फेकलेला चेंडू थेट ईशान किशनच्या पोटाला बॉल लागून तो जमिनीवर पडला. परंतु ही जखम अधिक गंभीर नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

भारतीय संघ अगदी सुसाट-

दरम्यान, घरच्या मैदानावर असलेल्या वर्ल्डकप मध्ये भारतीय संघ अगदी सुसाट आहे. कर्णधार रोहित शर्माचे कल्पक नेतृत्व, त्याला विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी फलंदाजीत दिलेली साथ, बुमराह, शमी आणि सिराज यांची आग ओकणारी गोलंदाजी आणि जडेजा – कुलदीप हि फिरकी जोडी यामुळे भारतीय संघ पूर्णपणे संतुलित वाटत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यंदा वर्ल्डकप जिंकून भारतीयांना खुश करण्याचा प्रयत्न रोहित सेना करेल यात शंकाच नाही.