भारताकडून दुर्मिळ अशा हायसिस उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीहरीकोटा | इस्त्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ३१ उपग्रह अवकाशात सोडून मोठी झेप घेतली. इस्रो ने दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी सकाळी ९:५८ वाजता पीएसएलव्ही ४३ प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी ३१ उपग्रह आंध्र प्रदेश श्रीहरीकोटा येथील सतीश धवन तळावरून सोडण्यात आले.

या ३१ उपग्रहामध्ये सर्वाधिक उपग्रह अमेरिकेचे होते. तर भारताच्या ‘ हायसिस ‘ या दुर्मिळ उपग्रहाचा समावेश करण्यात आला होता. अवकाशातील दोन वेगवेगळ्या कक्षेत हे उपग्रह सोडण्यात येणार आहे याची सम्पूर्ण प्रक्रिया ११२ मिनिटांची असेल.
इस्त्रो चे चेअरमन के.सीवन यांच्या मते असा उपग्रह अनेक देशातून अवकाशात पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अपेक्षित निकाल न येण्याची शक्यता जास्त असल्याने फार कमी देशांकडे हे उपग्रह आहे.

काय वैशिष्टये ‘ हायसिस ‘ची

१) हायसिस हा अत्यन्त दुर्मिळ उपग्रह आजच्या प्रक्षेपणात सहभागी झालेला उपग्रह आहे.
२) ३८० किलो वजन असलेल्या हायसिस चं आयुर्मान पाच वर्षाचं असेल.
३) कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणावर लक्ष या उपग्रहाद्वारे ठेवता येईल.
४) तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणारे हायसिस पाणी वनस्पती जमीन व इतर माहिती मिळवता येण्याची शक्यता आहे.
[youtube https://www.youtube.com/watch?v=26yzUKT2cHw&w=560&h=315]

Leave a Comment