सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
मिरज-अर्जुनवाड हा सांगली-कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यात जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग आहे. परंतु कृष्णानदीवरील पुल पुर्णपणे खचला असून अनेक ठिकाणी पुलावर भसके पडलेले आहेत. त्यामुळे कृष्णानदीवरील पुल हा मृत्यूचा सापळा बनला आहे. हा पुल म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरून वाहने ये-जा करीत असतात. मोठी दुर्घटना होण्याअगोदर या पुलाचे स्टक्चर ऍडीट करणे जरूरीचे असून त्याची डागडुजी होेणे अत्यंत महत्वाचे आहे. संबंधित विभागाने मोठी दुर्घटना होण्याअगोदर पुलाची डागडुजी करावी अशी मागणी आता वाहनधारकांतून तसेच कृष्णाघाट परिसरातील नागरीक व अर्जुनवाड येथील ग्रामस्थांतून होत आहे.
कृष्णा नदीवरील पुलाचे बांधकाम हे १९९३-९४ या कालावधीमध्ये झाले आहे. पुलांची लांबी २१० मिटर असून ७ गाळे आहेत. जवळ जवळ २५ वर्षे झाले हा पुल सर्वांची ओझी पेलत उभा आहे. या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट कधी झाले आहे हे कोणालाच माहिती नाही. परंतु या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. पुलावर आता तडा जावून बारीक भगदाड पडले आहे. त्या भगदाडातून नदीचे पाणी स्पष्टपणे दिसत आहे. या मार्गावरून वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा पुल महत्वाचा मानला जातो. कोणतीही मोठी दुर्घटना होण्या अगोरद संरक्षण कठडे व पुलाची डागडुजी होणे गरजेचे आहे. सांगलीहून कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी हा सोयीकररित्या मार्ग आहे. तसेच कर्नाटकात जाण्यासाठीही अगदी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर सतत वाहने ये-जा करीत असतात. कृष्णाघाट परिसरातील नागरीक व अर्जुनवाडातील ग्रामस्थांनी या पुलाची लवकरात लवकर डागडुजी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.