PMO वर अवलंबून राहणे फायद्याचे नाही, कोरोना युद्धाची जबाबदारी गडकरींकडे द्या! भाजप खासदारांचा घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात सध्या कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. रोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. अशा परिस्थिती सध्याची स्थिती हाताळण्यासाठी मोदी सरकारला अपयश आल्याची टीका केली जात आहे. मात्र राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द याबाबत असे वक्तव्य केले आहे. मोदींनी या कोरोना युद्धाची जबाबदारी केंद्रीय मंत्री गडकरींकडे सोपवावी, पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचे ठरणार नाही असे स्पष्ट वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

याबाबत बोलताना स्वामी यांनी ट्विट केले आहे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमण आणि ब्रिटिश साम्राज्यवाद यानंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोनाच्या साथीचा सामना करून नक्कीच टिकून राहू आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाही तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणूनच मोदींनी या करोना विरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरी याना सोपवावी पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचे ठरणार नाही ‘ अशा आशयाचे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

तसेच त्यांनी पुढे आणखी एक ट्विट केले आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘मी पंतप्रधान कार्यालय संदर्भात भाष्य केले आहे तो एक विभाग आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्या. स्वामी यांच्या या ट्विटरवर सध्याचे आरोग्यमंत्री असणाऱ्या हर्षवर्धन यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली त्यावरही स्वामी आणि उत्तर दिले आहे. नाही! हर्षवर्धन यांना मोकळेपणाने काम करून दिले जात नाही मात्र अधिकारवाणीने बोलणाऱ्या नेत्या सारखे ते खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल असे स्वामी यांनी म्हटले आहे.दरम्यान स्वामी यांच्या या दोन्ही ट्विटवरून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे

 

Leave a Comment