नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत 2.07 कोटींहून जास्त करदात्यांना 1.82 लाख कोटींहून जास्त रक्कम परत केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 21 फेब्रुवारी 2022 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. यामध्ये पर्सनल इनकम टॅक्स रिफंड 65,498 कोटी रुपये होतातर कॉर्पोरेट टॅक्स रिफंड 1,17,498 कोटी रुपये होता.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट केले आणि म्हटले, “सीबीडीटीने 1 एप्रिल 2021 ते 21 फेब्रुवारी 2022 दरम्यान 2.07 कोटींहून जास्त करदात्यांना 1,82,995 कोटी रुपयांहून जास्त रिफंड दिला आहे. 2,04,44,820 प्रकरणांमध्ये 65,498 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिफंड आणि 2,30,112 प्रकरणांमध्ये 1,17,498 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड जारी करण्यात आला आहे.”
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन वेबसाइटवरून रिफंडचे स्टेट्स तपासा-
तुमचा इन्कम टॅक्स रिफंड येणार असेल तर तुम्ही त्याचे स्टेट्स ऑनलाइन तपासू शकता. आयकर ई-फायलिंग पोर्टलद्वारे किंवा NSDL वेबसाइटद्वारे स्टेट्स तपासले जाऊ शकते.
>> सर्वप्रथम तुम्हाला http://www.incometax.gov.inया वेबसाइटवर जावे लागेल.
>> यूझर आयडी आणि पासवर्ड टाका.
>> लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ई-फायलिंगचा पर्याय दिसेल.
>> आता तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न निवडा
>> त्यानंतर View File Return वर क्लिक करा.
>> आता तुमच्या ITR डिटेल्स दाखवले जातील.
रिफंड मिळण्यास उशीर होण्याची ‘ही’ कारणे असू शकतात
इन्कम टॅक्स रिफंड अडकण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे बँक खात्याच्या तपशीलातील चूक. फॉर्म भरताना तुम्ही तुमच्या खात्याचा तपशील चुकीचा टाकला असेल, तर त्यामुळे तुमचा इन्कम टॅक्स रिफंड अडकू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर जाऊन आपल्या खात्याचे तपशील दुरुस्त करावे लागतील.