नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्षात (2021-22) 22 नोव्हेंबरपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 1.11 कोटींहून अधिक करदात्यांना 1,23,667 कोटी रुपयांहून अधिक रक्कम रिफंड केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 22 नोव्हेंबर 2021 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 41,649 कोटी रुपये होता तर कॉर्पोरेट्सचा 82,018 कोटी रुपये होता.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट करून सांगितले की, “CBDT ने 1 एप्रिल 2021 ते 22 नोव्हेंबर 2021 दरम्यान 1.11 कोटीहून अधिक करदात्यांना 1,23,667 कोटी रुपयांहून अधिक पैसे रिफंड केले आहेत. 1,08,88,278 प्रकरणांमध्ये 41,649 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिफंड जारी करण्यात आला आहे आणि 1,81,218 प्रकरणांमध्ये 82,018 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड जारी करण्यात आला आहे.
CBDT issues refunds of over Rs. 1,23,667 crore to more than 1.11 crore taxpayers from 1st Apr,2021 to 22nd November,2021. Income tax refunds of Rs. 41,649 crore have been issued in 1,08,88,278 cases &corporate tax refunds of Rs. 82,018 crore have been issued in 1,81,218cases(1/2)
— Income Tax India (@IncomeTaxIndia) November 24, 2021
गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2.38 कोटी करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड जारी केला होता. 2019-20 या आर्थिक वर्षात जारी केलेल्या 1.83 लाख कोटी रुपयांच्या रिफंडच्या तुलनेत हे 43.2 टक्के जास्त आहे.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन वेबसाइटवरून रिफंडचे स्टेट्स तपासा-
>> सर्वप्रथम तुम्हाला http://www.incometax.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
>> यूझर आयडी आणि पासवर्ड टाका.
>> लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ई-फायलिंगचा पर्याय दिसेल.
>> आता तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न निवडा
>> त्यानंतर View File Return वर क्लिक करा.
>> आता तुमच्या ITR चे डिटेल्स दाखवले जातील.