लोक मरावेत अशीच केंद्राची इच्छा आहे असं दिसतंय; न्यायालयाचे मोदी सरकारवर ताशेरे

0
37
narendra modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना उपचार प्रोटोकॉलमध्ये बदल केल्याबद्दल आणि उपलब्ध ऑक्सिजनचा पूर्णपणे पुरवठा न करण्यात आल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. करोना उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर औषधाचा पुरवठा करण्यासंदर्भातील प्रोटोकॉलनुसार केवळ ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांनाच हे औषध देण्यात यावे असं म्हटलं आहे. यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना पुरेसे प्रमाणात आणि वेळेत मिळत नाही. हे पूर्णपणे गैरव्यवस्थापन आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनवाचून लोक मरावेत अशी केंद्र सरकारची इच्छा दिसते, अशा कडक शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.

न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना, “हे चुकीचं आहे. नियम बनवताना बुद्धीचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही असं वाटतंय. ज्यांच्याकडे ऑक्सिजनची सुविधा नाहीय अशा ठिकाणी रेमडेसिविर औषध दिलं जाणार नाही. लोकांनी मरत रहावं अशीच तुमची इच्छा आहे, असं यावरुन वाटतंय,” असं मत नोंदवलं.

“रेमडेसिविरचा तुटवडा भरुन काढण्यासाठी प्रोटोकॉल बदलण्यात आले नाहीत. हे चुकीचं आहे. यामुळे डॉक्टरांना रुग्णांसाठी रेमडेसिविर औषध लिहून देता येणार नाही. या साऱ्यामधून नियोजनाचा आभाव दिसून येत आहे,” असंही न्यायालयाने केंद्राच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here