औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामध्ये शनिवार आणि रविवार पूर्णतः संचारबंदी असताना देखील अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडे ठेवताना दिसत आहेत. आज महानगर पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत संचारबंदी दरम्यान दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांकडून पंचवीस हजाराचा दंड वसूल केला.
दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास सुमारास पैठण गेट, रॉक्सी टाकी परिसरातील मोबाईल व इतर दुकाने सर्रास पद्धतीने चालू होती. महानगरपालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत या तब्बल 25 हजार रुपयांचा दंड छुप्या पद्धतीने दुकान चालवणाऱ्या दुकानदाराकडून वसूल केला आहे.
रविवार आणि शनिवार विकेंड लॉकडाऊन असतानाही मोबाइल दुकान चालक स्थानिक प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत दुकानाचे अर्धे शटर उघडून दुकान चालवताना मनपाच्या पथकाला आढळून आले. तर चक्क काही दुकान चालक आम्ही मनपाच्या पथकाला खिशात घेऊन फिरतो असेही उद्गार करण्यात आले. हॅलो महाराष्ट्रच्या बातमीनंतर महानगरपालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दुकानदारांवर कारवाई केली.