ITR filing: टॅक्स रिफंड अजूनही मिळालेला नसेल तर अशा प्रकारे चेक करा स्टेटस

नवी दिल्ली । तुम्हाला तुमचा इन्कम टॅक्स रिफंड अजून मिळाला नाही का…? कुठेतरी तुम्हीही ‘या’ 3 चुका तर केल्या नाहीत ना. रिफंड आला नसेल तर लगेच तपासा. अनेक वेळा करदात्यांना एका आठवड्याच्या आतच रिफंड मिळतो मात्र काही वेळा खूप वेळ लागतो. टॅक्स रिफंडचे स्टेट्स कसे तपासायचे आणि तुमच्‍या रिफंडला उशीर का होत आहे यामागील कारणे जाणून घेउयात.

जर तुम्ही बँकेचे डिटेल्स चुकीचे भरले किंवा काही गडबड केली असेल तर तुम्हाला रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकतो. याशिवाय, बँक खाते प्रीव्हॅलिडेट नसले तरीही तुमचा रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकतो. तसेच, तुमचा ITR व्हेरिफाय झालेला नसला तरीही रिफंड मिळण्यास वेळ लागेल.

इनकम टॅक्स रिफंड स्टेटस तपासण्याचे मार्ग

1. NSDL ची वेबसाइट तपासा.

>> रिफंड स्टेटस http://www.incometaxindia.gov.in किंवा http://www.tin nsdl.com वर ऑनलाइन तपासू शकता.

>> यापैकी कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन करा आणि Status of Tax Refunds टॅबवर क्लिक करा.

>> ज्या वर्षासाठी रिफंड पेंडिंग आहे त्या वर्षासाठी तुमचा पॅन नंबर आणि एसेसमेंट ईअर एंटर करा.

>> डिपार्टमेंटने रिफंड प्रोसेस केली असेल तर तुम्हाला मोड ऑफ पेमेंट, रेफरेंस नंबर, स्टेटस आणि रिफंडची तारीख नमूद करणारा मेसेज मिळेल.

>> रिफंडची प्रोसेस झाली नसेल किंवा ती दिली गेली नसेल तर तोच मेसेज येईल.

2. ई-फायलिंग पोर्टलवर अशा प्रकारे तपासा

>> येथे क्लिक करा आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये एंटर करा.

>> रिटर्न्स/फॉर्म पहा.

>> माय अकाउंट टॅबवर जा आणि इन्कम टॅक्स रिटर्न निवडा.

>> सबमिट वर क्लिक करा.

>> पावती (acknowledgement) नंबरवर क्लिक करा.

>> इनकम टॅक्स रिफंड स्टेटससह तुमचा रिफंड डिटेल्स दाखविणारे पेज दिसेल.

टॅक्स रिफंड म्हणजे काय?
आर्थिक वर्षातील आयकरदात्याच्या अंदाजे इन्व्हेस्टमेंट डॉक्युमेंट्सच्या आधारे ऍडव्हान्स रक्कम कापली जाते. मात्र जेव्हा तो आर्थिक वर्षाच्या अखेरीस अंतिम कागदपत्रे सादर करतो, तेव्हा जर त्याला असे आढळले की जास्त टॅक्स कापला गेला आहे आणि त्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून पैसे काढावे लागतील, तर तो रिफंड साठी ITR दाखल करू शकतो.