दिल्ली | जेपी नड्डा यांचा १ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक होणार आहे. १ फेब्रुवारीपर्यंत भाजपच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रदेश अध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील आणि त्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होईल. सूत्रांच्या माहितीनुसार जेपी नड्डा हे पक्षाचे अकरावे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
सध्या भाजपमध्ये संघटना निवडणुका सुरू आहेत. भाजपच्या राज्यघटनेनुसार, 50 टक्के पेक्षा जास्त राज्य अध्यक्ष निवडल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाऊ शकतात.
जे.पी. नड्डा हे १९९३ मध्ये हिमाचल प्रदेशचे आमदार म्हणून निवडून आले होते. विद्यार्थी राजकारणादरम्यान आणि संघटनांमध्ये विविध पदे भूषविताना एबीव्हीपीशी संबंधित होते. पुढे नड्डा राज्य आणि केंद्रात मंत्री झाले.