हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे चीनमध्ये अक्षरश: थैमान घातल आहे. कोरणामुळं चीनमध्ये आतापर्यंत २ हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतासह हा वायरस जवळपास ५० देशांमध्ये कोरोनाचे लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. भारतात या व्हायरसने दिल्लीतही दार ठोठावले आहे. दिल्लीतील एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळले आहे. तर तेलंगणामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे एक प्रकरण समोर आलं आहे. दरम्यान, या जीवघेण्या व्हायरसच्या विळख्यात आता सुपरस्टार जॅकी चॅन सुद्धा अडकल्याचे वृत्त चिनी माध्यातून येत आहे.
या वृत्तानुसार जॅकी चॅनला कोरोनाचा संशयीत रुग्ण म्हणून तडकाफडकी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्याला करोना विषाणूची लागण झाल्याची कुठलीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. सध्या त्याच्यावर वैद्यकिय तपासणी सुरु आहे.
Jackie Chan rushed to hospital with suspected coronavirus – media https://t.co/AQAEw9ghNr pic.twitter.com/VwyfiOKVv1
— vkratce.uz (@VkratceU) February 27, 2020
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने जागतिक कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये जाण्याची आपली योजना रद्द केली आहे. पॅरिस फॅशन वीक ३ मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, लक्झरी ‘फॅशन हाऊस लूई वीटॉन’ ने दीपिकाला पॅरिस फॅशन वीकमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण पाठवले होते. मात्र, कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळं दीपिकाने पॅरिसची आपली ट्रिप नुकतीच रद्द केली आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.