मुंबई प्रतिनिधी | हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या पार्श्वभुमिवर अभिनेता जॅकी श्रॉफने बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी “महाराष्ट्राचा आदर करायला मला बाळासाहेबांनीच शिकवले” असे श्राॅफ यांनी म्हटले.
“बाळासाहेब हे माझ्या वडिलांसारखे होते. त्यांनीसुद्धा मला त्यांच्या मुलाप्रमाणे वागवले. आपल्या आयुष्यात ‘तुम्ही जिथे राहता, जिथे खाता-पिता, जिथे तुमचा जन्म झाला त्या ठिकाणाचा आदर केेला पाहिजे” हे बाळासाहेबांनी मला शिकविले असे श्राॅफ यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले. ‘एखाद्या गंभीर विषयालाही हास्यात रुपांतर करायचं अजब कौशल्य बाळासाहेबांकडे होते. त्यांचे व्यक्तिमत्व अप्रतिम होते. त्यांच्या बोलण्याच्या आणि लिहिण्याच्या स्टाइलने मला भुरळ पाडली होती. मी काम जास्त करतो आणि बोलतो कमी, असे नेहमी ते म्हणायचे. त्यांचा हाच सल्ला मी अंगिकारला आहे.” अशी माहीती श्राॅफ यांनी यावेळी बोलताना सांगितली.
‘ठाकरे’ या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरेंची तर अभिनेत्री अमृता राव हिने माँसाहेबांची भूमिका साकारली आहे. ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली तर अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
इतर महत्वाचे –
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?