राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातील तालिबान; राजद नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह (Jagdanand Singh) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) वर टीकास्त्र सोडताना राजद नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना थेट तालिबानसोबत केली आहे. आरएसएस हेच भारतातील तालिबानी आहेत असा घणाघात त्यांनी केला.

तालिबानी अफगाणिस्तानमध्ये जे काम करतात, तेच काम भारतात संघ करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातील तालिबान असून ते बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण करत असतात. आपण यांना थांबवायला पाहिजे, असं सिंह यांनी म्हटलं आहे. सिंह यांनी तालिबान आणि संघ यांच्यातील फरक समजून सांगताना अशी तुलना केली आहे.

दरम्यान, जगदानंद सिंह यांच्या या विधानावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे. जो व्यक्ती ज्या समाजात राहतो, तो तसा विचार करतो अस म्हणत सिंह यांच्या वक्तव्याचा भाजपने खरपूस समाचार घेतला आहे. तसेच राजद ज्या संस्कृतीचा भाग आहे, त्यानुसार जगदानंद वक्तव्य करत आहेत, असं भाजप प्रवक्ते अरविंद सिंह यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment