Jai Shree Ram On Sea Link । अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यापूर्वी संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरातून लाखो रामभक्त अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत तसेच सगळीकडे जय श्रीरामचा नाराही आपल्याला पाहायला मिळत आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक ‘जय श्री राम’ या शब्दांनी उजळून निघाला (Jai Shree Ram On Sea Link). अतिशय दिमाखणार अशी रोषणाई या सी लिंक वर पाहायला मिळत आहे. याबाबतचा एक विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे विडिओ मध्ये- Jai Shree Ram On Sea Link
आपण या विडिओ मध्ये पाहू शकता कि, यामध्ये प्रभू श्रीरामाचे चित्र दिसत आहे. तसेच भगव्या अक्षरात जय श्री राम शब्दात रोषणाई करण्यात आली आहे. हा विडिओ प्रत्येक राम भक्ताला बघावासा वाटेल. संपूर्ण वांद्रे वरळी सी लिंक आकर्षक लाइटिंग आणि सजावटीने सजलेला (Jai Shree Ram On Sea Link) पाहायला मिळत आहे. विडिओ पाहून तुमचाही अंगात नवा उत्साह येईल हे नक्की…..
Bandra-Worli sea link pic.twitter.com/vOZjSzr9qT
— Mumbai Heritage (@mumbaiheritage) January 20, 2024
दरम्यान, उद्या २२ जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडेल. यासाठी देशभरातून तब्बल ८००० पेक्षा जास्त दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. राम भक्त सुद्धा मोठ्या संख्येने अयोध्येचा रवाना झाले आहेत. मंदिराच्या उद्घटना पूर्वी राम मंदिराला फुलांच्या साठ्याने विशेष दिव्यांनी सजवण्यात आले आहे. ही सर्व नैसर्गिक फुले आहेत आणि हिवाळ्यामुळे ती अधिक काळ टिकू शकतात. त्यामुळे अभिषेक सोहळ्याच्या दिवशी ते ताजे राहतील. फुलांच्या सजावटीने आणि रोषणाईने संपूर्ण अयोध्या नगरी चांगलीच उजळून निघाली आहे.