Tuesday, June 6, 2023

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 500 पार, जिल्हावासीयांची चिंता वाढली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 25 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवालांपैकी 25 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

रावेर, पारोळा भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तींचे अहवाल आज दुपारी प्राप्त झालेत. त्यापैकी 09 पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यातील पाॅझिटिव्ह आढळलेल्या आठ व्यक्ती ह्या भडगावच्या असून एक व्यक्ती धरणगाव येथील आहे. आजच्या ह्या अहवालानंतर जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ही 501 झाली आहे.

जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्ण संख्येने आता जळगाव करांची चांगलीच चिंता वाढवली आहे. सततची वाढती संख्या बघता आता शहरवासी व जिल्ह्यातील पादुर्भाव झालेल्या ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.