ये भैय्या बताइयें वॅक्सीन कब आयेगी? राहुल गांधींचा आशिष झा यांना प्रश्न 

वृत्तसंस्था । कोरोना विषाणूच्या या वाढत्या प्रादुर्भावात माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सतत कर्यरत दिसत आहेत. ते ठिकठिकाणी लोकांना भेटत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. तसेच वेगवेगळ्या तज्ज्ञांशी ही ते व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बोलत आहेत. त्यांनी भारतीय वंशाचे अमेरिकेतील स्वास्थ्य विशेषतज्ञ आशिष झा यांच्याशी बातचीत केली आहे. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी आशिष झा यांना विचारत आहेत. ‘ये भैय्या बताइयें वॅक्सीन कब आयेगी?’ त्यांच्या या प्रकारे प्रश्न विचारण्यावर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आशिष झा यांनी पुढच्या वर्षीपर्यंत नक्की वॅक्सीन येईल असे सांगितले आहे. त्यांनी भारतीय, चीनी आणि अमेरिकी अशा तीन लसींची अपेक्षा असल्याचे सांगितले आहे. त्यांचे म्हणणे आहे की या तीनपैकी एखादी किंवा तीनही लसी उपयुक्त आणि प्रभावी असू शकतील. मला नक्की कोणती लस ते सांगता येणार नाही पण पुढच्या वर्षीपर्यंत यावर एखादी लस नक्की येईल असे त्यांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणू पुढच्या वर्षीपर्यंत राहणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हळूहळू आर्थिक गोष्टींची सुरुवात करणे तसेच लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 

आशिष झा हे अमेरिकेत जन स्वास्थ्य विशेषतज्ञ आहेत. तसेच नुकतीच त्यांची ‘ब्राऊन युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ पब्लिक हेल्थ’ येथे डीन म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी सांगितले की कोरोनाचा आर्थिक आणि स्वास्थ्यसंबंधी परिणाम आहेच पण मानसिक परिणाम ही झाला आहे. आणि सरकारला याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांना आता दैनंदिन जीवन बदलणार असल्याची कल्पना देणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. कारण अजून किमान १८ महिने हा विषाणू आपल्यासोबत राहणार आहे असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.