जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; आज 858 रुग्णांची भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 858 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 24385 झाली आहे. त्याच प्रमाणे 506 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 6515 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 17105 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 13 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण 765 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आज 514 पॉझिटीव्ह रुग्णांना होम आयसोलेशन ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे –  जळगाव शहर 94, जळगाव ग्रामीण 29, भुसावळ 81, अमळनेर 1, चोपडा 49, पाचोरा 25, भडगाव 24, धरणगाव 40, यावल 19, एरंडोल 99, जामनेर 226, रावेर 20, पारोळा 54, चाळीसगाव 64, मुक्ताईनगर 23, बोदवड 08 अशी रुग्ण संख्या आहे.


Leave a Comment