सामाजिक कार्यकर्त्या ऍड.वर्षा देशपांडे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

सातारा प्रतिनीधी | केस करू नये तसेच प्रकरण मिटविण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करून कानाखाली मारल्याप्रकरणी येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात भारतिय दंड संहिता कलम 385 नुसार खंडणीचा (जुलमाने घेणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तमन्ना आमीन मुजावर (वय 28, रा. माची पेठ, सध्या रा. नागठाणे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. तमन्ना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्राची नावाच्या मैत्रीणीच्या माध्यामतून त्यांची ऐश्‍वर्या विठ्ठल जाधव हीच्याशी ओळख झाली. त्यानंतर तीने घरात रहात नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी तीला त्यांच्या घरी राहण्यास सांगितले. आक्‍टोंबर 2019 मध्ये त्यांनी ऐश्‍वर्या हीला कपडे खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये दिले होते. ते तीने काम करून परत केले. त्यानंतर तीने पुन्हा मित्राला देण्यसासाठी, रूम भाडे देण्यासाठी तसेच खरेदीसाठी म्हणून 15 हजार रुपये उसने घेतले. त्यातील बारा हजार 250 रुपये तीने परत केले.

शिल्लक राहिलेले अडीच हजार रुपये मागितल्यावर तीने कारणे देण्यास सुरवात केली. वारंवार कामावर बोलावून पैसे परत मागूनही पैसे दिले नाहीत. पैशाची गरज असल्याने तमन्ना यांनी तगादा लावला. त्यानंतर तीने माझी व मित्राची केस मुक्तागण ऑफीसमध्ये ऍड. वर्षा देशपांडे यांच्याकडून चालू आहे. त्यातून पैसे मिळाले की देतो असे सांगितले. पुन्हा पैशाची मागणी केल्यावर ऐश्‍वर्याने मुक्तांगण ऑफीसमध्ये यायला सांगितले.

सोमवारी (ता. 24) तमन्ना दुपारी अडीचच्या सुमारास बहिणीसह मुक्तांग ऑफीसमध्ये गेल्या. तेथे पैशावरून तयांचा ऐश्‍वर्याची वाद झाला. त्या वेळी देशपांडे यांनी तीला आत बोलावून घेतले. तसेच ऐश्‍वर्या तुला काही माघारी देणार नाही, कुठल्याच वस्तू मागू नको, आम्ही तुझी हिस्ट्री काढू, तू काय धंदे करतेस आम्हाला माहित आहे असे त्या म्हणाल्या. त्यानंतर तुम्ही माझी चौकशी करा असे तमन्ना यांनी त्यांना सांगितले. त्या वेळी हो करतो असे म्हणून त्यांनी कोणाला तरी फोन लावला व तमन्ना यांची चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर देशपांडे यांनी त्यांना रजिस्ट्रवर सही करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी आवाज चढवून बोलू नकोसे असे म्हणून कानाखाली मारली. तसेच माझ्या बहिणीला धक्का दिला. त्यानंतर देशपांडे यांनी आम्हाला तेथेच बसण्यास सांगून ऐश्‍वर्यास ऑफीसमध्ये बोलावून घेतले. तसेच आमच्यावर खोट्या केसेस करण्यास सांगितले.

त्यानंतर ऐर्श्‍वयाने तुझ्यावर केस करू नये असे तुला वाअत असेल तर मला 50 हजार रुपये द्यावे दे अशी मागणी ऍड. देशपांडे यांनी केली. पैसे दिले तर इथेच तुझी केस मिटवते असे त्या म्हणाल्या. अन्यथा ऐश्‍वर्याला सांगून तुझ्यावर खोट्या केसेस करण्यास सांगते असे देशपांडे म्हणाल्या. एवढे पैसे नाहीत म्हटल्यावर तुला एवढे पैसे द्यावेच लागतील असे ऍड. देशपांडे म्हणाल्याचे तमन्ना यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार ऍड. वर्षा देशपांडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.