जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दहशत सुरूच असून आज नव्या 114 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 1395 इतकी झाली आहे. आतापर्यंत 129 मृत्यू तर 567 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोना विषाणूचे देशभर थैमान चालू असताना जळगाव जिल्ह्यात देखील दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. काल मंगळवारी देखील एका दिवसात 115 रुग्ण यांचे अहवाल पोसिटीव्ह मिळाले होते. आज देखील 114 रुग्ण हे पोसिटीव्ह आढळून आले आहेत.
आज सर्वाधिक 39 रुग्ण हे अमळनेर येथे आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे पारोळा-21,भुसावळ -19, जामनेर-11, जळगाव -09 यावल व एरंडोल येथे प्रत्येकी 05 व इतर तालुक्यातील रुग्ण मिळून 114 रुग्णांची भर पडली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार हा जिल्ह्यात वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णाची वाढती आकडेवारी ही चिंताजनक बनत आहे. जळगाव , भुसावळ व अमळनेर शहरांनी 200 च्या वर रुग्ण संख्येचा आकडा पार केला आहे.
#जळगाव जिल्ह्यात आज नवीन 114 कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यात #कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1395 झाली. #stayhome #Lockdown @WeAreChalisgaon @WeAreJalgaon @WeAreBhadgaon @DDSahyadri @AIRJALGAON @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @News18lokmat @JaiMaharashtraN @saamTVnews pic.twitter.com/oQloPA2PL1
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) June 10, 2020