जालना औरंगाबाद रोडवर एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! 7 प्रवासी जखमी

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना औरंगाबाद रोडवर एका खासगी बसचा भीषण अपघात (accident) झाला आहे. पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात (accident) झाला आहे. ओव्हरटेकिंग करताना बस पलटी होऊन हा अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात 7 प्रवासी जखमी झाले आहेत. हि खासगी ट्रॅव्हल्स पुण्याहून रिसोडकडे जात होती. बालाजी ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस होती.

काय घडले नेमके?
ओव्हरटेक करत असताना भरधाव वेगात असलेली खासगी बस रस्त्यावरील डिव्हायडरच्या कठड्यावर आदळली. कठड्यावर आदळताना बसचा वेग प्रचंड होता. त्यामुळे ही बस रस्त्यावरच उलटली (accident). या अपघातामुळे रस्त्यावरील एक बाजू पूर्णपणे ब्लॉक झाली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीदेखील झाली. या अपघातामध्ये (accident) बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. या अपघाताप्रकरणी (accident) पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!